तब्बल 36 वर्षे गर्भात होता बाळाचा सांगडा

August 20, 2014 4:57 PM0 commentsViews: 3664

20 ऑगस्ट : तब्बल 36 वर्षे आपल्या गर्भात आठ महिन्याच्या बाळाचा सांगडा घेऊन जगत असणार्‍या महिलेला नागपूरच्या लता मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जीवदान दिले आहे. मेडिकल सायन्ससाठी ही घटना चमत्कारिक आणि आश्चर्य वाटणारी असून संपूर्ण जगात अशाप्रकारची ही बहुदा पहिलीच घटना असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मध्य प्रदेशातील पिपरिया गावात राहणार्‍या या 26 वर्षांच्या महिलेला 1978 मध्ये गर्भधारणा झाली होती, मात्र बाळाच्या ह्रदयाचे ठोके कमी झाल्याने त्यांना नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांच्या गर्भातील बाळाचा मृत झाल्याचे डॉक्टरांनी त्यांना सांगितले आणि त्यांना गर्भपाताचा सल्ला दिला. पण गावात राहणार्‍या या महिलेने डॉक्टरांचा सल्ला न एकता गर्भापाताकरण्यासाठी तिने गावातच उपचार घेतला. पण मृत अर्भकाचा फक्त सांगाडाच त्यांच्या शरीरात तसाच राहिला होता. आश्चर्य म्हणजे इतके वर्ष त्यांना काहीही त्रास झाला नाही. पण गेले काही दिवसापासून पोट दुखत असल्याने त्या नागपूरच्या या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या. लता मंगेशकर हॉस्पिटलच्या सर्जरी विभागाच्या डॉक्टरांनी पाच तासाच्या शस्त्रक्रियेनंतर हा सांगाडा बाहेर काढून या महिलेला जीवदान दिलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close