विधानसभा निवडणुकांच्या तारखा 28 ऑगस्टला होणार जाहीर ?

August 20, 2014 6:55 PM0 commentsViews: 1599

election 201420 ऑगस्ट : लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामानंतर आता लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा या राज्यांमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या तारखा पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

28 ऑगस्ट रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून मिळालीय.

निवडणुकीच्या तारखा ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या चर्चा सध्या सुरू आहेत. काही राज्यांमधल्या पोटनिवडणुका झाल्यानंतर तारखा जाहीर होऊ शकतात.

त्यामुळे महाराष्ट्रात पुढच्या आठवड्यातच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. तर जम्मू आणि काश्मीरमधल्या निवडणुकीच्या तारखा नंतर जाहीर होणार असल्याचं समजतंय.

#IBNLelection
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close