इरोम शर्मिलांची मुक्तता, उपोषण सुरूच राहणार

August 20, 2014 6:45 PM0 commentsViews: 773

irom20 ऑगस्ट : गेल्या 14 वर्षांपासून उपोषण करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिल यांची अखेर सुटका कऱण्यात आली आहे. मणिपूर कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आज इरोम शर्मिला यांची दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू हॉस्पिटलमधून सुटका करण्यात आली.

शर्मिला यांना नळ्यांद्वारे जबरदस्तीने अन्न देण्यात येत होतं. गेली 14 वर्षं त्या उपोषण करत आहे. त्यामुळे त्या गेली अनेक वर्षं दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू हॉस्पिटलमध्ये दाखल होत्या. तिथेच त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. सुटका झाली असली तरी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार शर्मिला यांनी व्यक्त केला आहे.  2 नोव्हेंबर 2000 रोजी लष्कराला विशेषाधिकार देणारा आणि आर्म्ड फोर्सेस स्पेशन पॉवर्स ऍक्ट रद्द करावा यासाठी इरोम यांनी उपोषणाला सुरुवात केली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close