आपणच योग्य उमेदवार, तिकीट द्याच -नितेश राणे

August 20, 2014 9:03 PM0 commentsViews: 2242

nitesh rane on sena20 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचा धाकटा मुलगा नितेश राणे यांनी सुद्धा इच्छुक उमेदवार म्हणून कणकवली मतदारसंघासाठी मुलाखत दिली.

इथून आपणच योग्य उमेदवार असून आपल्यालाच योग्य उमेदवारी देण्यात यावी असा आग्रह नितेश यांनी धरलाय. आपल्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळेच आपण मुलाखतीला आलो आणि आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी नितेश यांनी केली.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी हजारोंनी अर्ज आले आहेत. त्यामुळे अर्जांची छाननी करुन प्रदेश काँग्रेसच मुख्यालय टिळक भवनात सोमवारपासून इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

288 जागांसाठी आम्ही अर्ज मागवले असून त्यातल्या 174 मुलाखती आज पूर्ण होतील असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्र्यांच्या नातेवाईकांना तिकीट देणार नाही जो सच्चा कार्यकर्त्या आहे त्यालाच तिकीट दिलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close