पाचव्या टप्प्यातल्या मतदानाला हिंसाचाराचं गालबोट

May 13, 2009 5:26 PM0 commentsViews: 1

13 मे शेवटच्या टप्प्यातल्या मतदानादरम्यान देशात काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि सीपीएमच्या कार्यकर्त्यांमध्ये दोन ठिकाणी चकमक झाली. सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या बॉम्बफेकीत तृणमूलचा एक कार्यकर्ता ठार झाला. तर चकमकीत तृणमूलचे 2 आणि सीपीएमचे 2 कार्यकर्ते जखमी झालेत. चेन्नईत मतदानादरम्यान द्रमुक आणि एमडीएमकेच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमक झाली. त्यात 6 लोक जखमी झाले. तर मतदानाच्या पूर्वसंध्येला तामिळनाडूमध्ये मना-मदुराईजवळ केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्थी यांच्या कारवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. कार्थी किरकोळ जखमी झालेत. हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या पाच टप्प्यातल्या मतदानादरम्यान एकूण 37 जणांचा मृत्यू झाल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

close