बेपत्ता जवानाचं पार्थिव 18 वर्षांनंतर सापडलं

August 20, 2014 10:27 PM0 commentsViews: 2866

Missing soldier20 ऑगस्ट : सियाचीनमध्ये तब्बल 18 वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या जवानाचं पार्थिव सापडल्याची घटना घडलीय. उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील रहिवासी गया प्रसाद हा जवानाचं पार्थिव तब्बल 18 वर्षांनी सापडलंय.

18 वर्षांपूर्वी 15 राजपूत बटालियनकडून सियाचीनमध्ये पोस्टिंगवर होते. उंच भागात संरक्षण करणार्‍या जवानांना विमानाद्वारे खाद्यपदार्थांची पार्सल्स देण्यासाठी ते गेले होते. इतके वर्षं त्यांचा काहीच ठावठिकाणा न लागल्याने घरच्यांनीही गया प्रसाद यांचा मृत्यू झाल्याचं गृहित धरलं होतं.

काल खांदा -डोलमा दरम्यान असलेल्या गस्तीपथकाला हे पार्थिव आढळून आलं. गयाप्रसाद यांचं पार्थिव त्यांच्या कुटंुबियांकडे आज सोपावण्यात आलं, त्यामुळे एकाच वेळी दु:ख आणि अभिमानाची भावना कुटुंबियांमध्ये होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close