पोलिसांच्या मुलांना 5 टक्के आरक्षण

August 21, 2014 9:58 AM0 commentsViews: 1503

police_0_0_1_0

21 ऑगस्ट :  पोलिसांच्या मुलांना 5 टक्के आरक्षण पोलिसांच्या मुलांना पोलीस भरतीत 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय काल (बुधवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

पोलीस दलात सेवा बजावणारे पोलीस निवृत्त झाल्यानंतर किंवा त्यांचा अकाली मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला आधार नसतो. त्यामुळे पोलिसांच्या मुलांना नोकरीत आरक्षण देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यानुसार पोलिसांच्या मुलांना पोलीस भरतीमध्ये 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात सेवेत कार्यरत असताना अकाली मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या पोलिसांच्या मुलांना 2 टक्के राखीव आरक्षण ठेवण्यात आलं असल्याची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close