16 मे नंतरच्या समीकरणांसाठी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग

May 14, 2009 7:25 AM0 commentsViews: 2

14 मे देशभर सुरू असणार्‍या लोकसभा निवडणुकांचा शेवटचा टप्पा काल संपला आहे. आता सत्ता – स्थापनेसाठी राजकीय समीकरणांच्या जुळवाजुळवीला दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे दिल्लीत फिल्डींग लावण्यासाठी सर्व पक्षाचे आघाडीचे नेते डेरेदाखल होताहेत. एकीकडे भापजचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी अडवाणींची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहचले आहेत. तर, दुसरीकडे काँग्रेसकडूनही दिल्लीची सत्ता-सूत्रं आपल्याच हाती ठेवण्यासाठी राजकीय नेत्यांच्या भेटी-गाठी घेण्यात येत आहेत. आज गुरूवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचीही दिल्लीत बैठक होणार आहे. त्यात 16 मेनंतरची व्यूहनीती ठरण्याची शक्यता आहे. काल बुधवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. ही राजकीय भेट नसल्याचं स्पष्टीकरण नितीश कुमार यांनी दिलं असलं, तरी एनडीएनची साथ सोडून काँग्रेसच्या गोटात दाखल होण्यासंदर्भातली ही बैठक होती, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यातच आता समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमरसिंगही दिल्लीत पोहचले आहेत. 16 मेला निवडणुकांचा निकाल लागल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाईल, असं अमर सिंग यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

close