निलेश राणेंचं तलवार म्यान, अपक्ष लढणार नाही !

August 21, 2014 6:09 PM0 commentsViews: 1365

nilesh rane news21 ऑगस्ट : काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचे चिरंजिव निलेश राणे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं. पण आता निलेश राणे बॅकफुटवर गेले आहे.

निलेश यांनी गुहागरमधून उमेदवारी मागे घेतलीय. आपले वडील नारायण राणे यांच्या मार्गदर्शनानुसार ही उमेदवारी मागे घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. पण राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधवांविरोधात उघडपणे काम करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

दोन दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी गुहागरमधून अपक्ष म्हणून लढणार असल्याची घोषणा करुन आघाडीला आव्हान दिलं होतं. लोकसभा निवडणुकीत भास्कर जाधवांनी आघाडीधर्म पाळला नाही.

त्यांना जी पैशाची मस्ती चढलीय ती उतरवणारण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार केला होता. मात्र काँग्रेस नेत्यांनी आघाडीत असताना अपक्ष म्हणून निवडणूक लढवता येणार नाही असं स्पष्ट केलं. त्यामुळे अखेर नारायण राणे यांनी निलेश राणेंची समजूत काढली आणि त्यानंतर निलेश यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close