…’त्या’ उंदरांमुळे महायुतीचं जहाज बुडेल-राजू शेट्टी

August 21, 2014 6:49 PM0 commentsViews: 8576

raju shetty on aap21 ऑगस्ट : एकीकडे महायुती मजबूत असल्याचे दावे होत असताना प्रत्यक्षात महायुतीत धुसफुस सुरू झाल्याची चिन्हं आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीचं जहाज आता बुडू लागलंय. पण त्या जहाजाला कुडतरणारे उंदीर आता महायुतीच्या जहाजात बसू पाहत आहेत. त्यांना किती महत्त्व द्यायचं हे शिवसेना-भाजपनं आता ठरवायला हवं. नाहीतर महायुतीचं जहाज बुडायला वेळ लागणार नाही अशी भीती महायुतीचे घटकपक्ष असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

तसंच कोल्हापूरच्या शाहूवाडी मतदारसंघात सेनेच्या सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यावरुन राजू शेट्टी शिवसेनेवर नाराज आहेत. शिवसेना सत्यजित पाटील यांना उमेदवारी द्यायला इच्छुक आहे, मात्र लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी आपल्या उमेदवारीला विरोध केल्याचा शेट्टींचा दावा आहे.

पाटील यांनी काँग्रेसच्या कल्लाप्पाणा आवाडे यांना मदत केली होती. जो माणूस काँग्रेसला मदत करतो त्याला उमेदवारी देण्याचं शिवसेनेचं राजकारण न समजण्याजोगं आहे. शिवाय माझ्या मतदारसंघात शिवसेना कार्यक्रम घेत असेल आणि त्याबद्दल आम्हाला अजिबात विश्वासातच घेतलं जात नसेल तर ते चुकीचं असल्याचीही राजू शेट्टींची भावना आहे. त्यामुळे आजच्या शाहुवाडीत आज झालेल्या कार्यक्रमालाही राजू शेट्टी उपस्थित नव्हते.

दरम्यान,  भाजप आणि सेनेची ताकद नाही त्याच ठिकाणच्या जागा आम्ही मागतो आहोत, असं राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी म्हटलंय. अहमदपूरचे माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी रासपात प्रवेश केला. या जाहीर सभेत जानकर बोलत होते. विनायकराव पाटील, बाळासाहेब नाहाटा, भगवान सानप, बाळासाहेब हन्डोग्रीकर ही नावं फायनल झाल्याचंही जानकर यांनी सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close