हिट अँड रन प्रकरणातील साक्षीदारांचे जबाबच गहाळ

August 21, 2014 9:13 PM3 commentsViews: 1138

salman_khan_hit_&_run21 ऑगस्ट : अभिनेता सलमान खान हिट अँड रन प्रकरणी आज (गुरुवारी) मुंबई सेशन्स कोर्टात सुनावणी झाली. 63 पैकी 56 साक्षीदारांच्या जबाबाची कागदपत्र गहाळ झाल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे.

या प्रकरणाचा तपास करणारे तत्कालीन पोलीस निरीक्षक किसन शेंजाळे यांना पुढच्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. शेंजाळे आता निवृत्त झाले आहेत.

पोलीस खातं केसची पुनर्बांधणी कशी करणार याचा अहवाल कोर्टाला सादर करावा, असा आदेशही कोर्टाने दिलाय. कागदपत्रं गहाळ झाल्यानं उशीर होत असल्यानं सेशन्स कोर्टानी नाराजी व्यक्त केली. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 12 सप्टेंबरला होणार आहे.

सलमान खानने 2002 साली बेदरकारपणे गाडी चालवून फूटपाथवर झोपलेल्या निष्पाप लोकांना चिरडलं होतं. या अपघातात 1 जणाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले होते.

हिट अँड रन प्रकरणाचा घटनाक्रम

 • 28 सप्टेंबर 2002 – मुंबईत सलमानच्या गाडीखाली चिरडून 3 जखमी, 1 मृत्युमुखी
 • - सलमान खानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
 • - महानगर दंडाधिकारी न्यायालयात प्रकरणाची सुनावणी रेंगाळली
 •  2013 – खटला मुंबई सेशन्स कोर्टाकडे
 • - खटला नव्याने सुरू करण्याची सलमानच्या वकिलांची मागणी मान्य
 • - 28 एप्रिल 2014 पासून खटल्याची नव्याने सुनावणी
 • - पहिल्या पंच साक्षीदाराची साक्ष नोंदवून खटल्याला सुरुवात
 • - 6 मे 2014 – सलमान खानची ओळख परेड
 • - प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने सलमानला ओळखले
 • - 19 मे – चौथ्या साक्षीदारांनीही सलमानला ओळखले

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • hemantkochale

  इथे पैसे असणार्यान्च्जी चालते .सामान्य लोकांना काहि कीमत नाही आहे

 • Sham Dhumal

  अफाट भ्रष्टाचाराचे हे ज्वलंत उदाहरण आहे. पैसेवाले पैशाच्या जोरावर काय करु शकतात हे दिसून येते. सामान्य लोकांना न्याय कसा मिळणार? फायली गहाळ होणे. कागदपत्र जळून जाणे हे प्रकार अनेकदा घडतात तरीसुध्दा त्यावर कडक उपाय का काढले जात नाहीत? हे सर्व धनाढ्य लोकांना वाचविण्यासाठीच ना?

 • Sham Dhumal

  न्याय खरेदी केला जात असेल तर आपल्या देशात लोकशाही आहे असे म्हणता येईल का?

close