पंतप्रधानपदासाठी शरद पवार चौथ्या आघाडीच्या संपर्कात

May 14, 2009 11:09 AM0 commentsViews: 1

14 मे,राष्ट्रवादीने लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग आणि रामविलास पासवान यांच्या चौथ्या आघाडीशी संपर्क साधल्याची माहिती आयबीएन लोकमतला मिळाली आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या शर्यतीमधील इच्छुक उमेदवार शरद पवार यांनी आपल्या हालचाली वाढवल्या असल्याची चिन्ह स्पष्ट होत आहेत. तसंच सोनिया गांधी यांनीही शरद पवार यांच्याशी आज सकाळी सुमारे अर्धा तास फोनवरून चर्चा केल्याचं समजतंय. या चर्चेत आपण काँग्रेससोबत राहणार असल्याचं आश्वासन शरद पवार यांनी सोनिया गांधींना दिलं असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान सत्तेच्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू असताना पंतप्रधानपदासाठी उत्सुक असणारे शरद पवार खासदारांची जमवाजमव करण्याच्या प्रयत्नात असल्याचं समजतंय. एक्झिट पोलच्या मतानुसार सध्या शरद पवार यांच्याजवळ डझनापेक्षाही कमी खासदार आहेत. तर एकीकडे भाजप आणि काँग्रेस आघाडीवर असल्यामुळे राष्ट्रवादी त्यांच्याबाजूने फिल्डिंग लावण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

close