मणिपुरमध्ये ‘मेरी कोम’वर बंदी

August 22, 2014 10:24 AM0 commentsViews: 2678

2013107123831410734_20

मिहिर त्रिवेदी, मुंबई

22 ऑगस्ट :  प्रियांका चोप्राचा बहुचर्चित सिनेमा मेरी कोम प्रदर्शनासाठी सज्ज आहे. ऑलिम्पिक स्टार, सुपर मदर मेरी कोमच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. पण मणिपूरच्या बॉक्सिंग स्टारची ही कहाणी मणिपूरच्या प्रेक्षकांनाच पाहता येणार नाही आहे.

माझ्या आयुष्यावर सिनेमा येईल असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता असं सांगणारी ऑलिम्पिक स्टार मेरी कोम, तिच्या जीवनावर सिनेमा येतोय याबद्दल ती फारच उत्सुक आहे. ओमंग कुमार दिग्दर्शित मेरी कोम या सिनेमातून मेरी कोमची संघर्षमय कहाणी रुपेरी पडद्यावर अवतरतेय.पण दुदैर्व असं की मेरी कोमची मणिपूरमधल्या तिच्या परिवाराला आणि मित्रमंडळींना मात्र हा सिनेमा बघता येणार नाही.

2000 सालापासून मणिपूरमध्ये हिंदी सिनेमा प्रदर्शित होत नाही. हिंदी सिनेमांवर मणिपूरमध्ये पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मेरी कोमचा हा सिनेमा मणिपूरमध्ये रिलीज होणार नाही. पण या चित्रपटाबाबत मेरी स्वत: आशावादी आहे. ते माझ्या हातात नाही, सगळेच यासाठी प्रयत्न करतायत अगदी देवसुद्धा, असं ती म्हणाली. मेरी कोम या सिनेमाचे निर्मातेही मणिपूरमध्ये हा सिनेमा रिलीज होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. कारण मणिपुरी प्रेक्षकांमध्येही सिनेमाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

या सिनेमात मेरी कोमची भूमिका प्रियंका चोपडाने केली आहे. ‘मी प्रार्थना करतेय, मेरी स्वत: प्रार्थना करतेय आणि आमचे निर्मातेदेखील. तेव्हा आशा करूया की आम्ही यशस्वी होऊ , अशी प्रतिक्रिया प्रियंकाने दिली आहे. आम्ही आमच्याकडून 100 टक्के प्रयत्न करतोय आणि माझे कलाकारदेखील ट्विट करत आहेत. पाहूया काय होतंय ते, असं मत सिनेमाने दिग्दर्शिक ओमंग कुमार यांनी व्यक्त केलं आहे. सिनेमा ही एक कला आहे आणि कुठल्याच कलेला जगात कुठेच बंदी नसावी असं क्रिटिक्सचं म्हणणं आहे.

जर हिंदीमध्ये मेरी कोम प्रदर्शित व्हायला मणिपूरमध्ये फारच अडचणी आल्या तर सिनेमा मणिपुरी भाषेत डब करणं हा एकच पर्याय निर्मात्यांसमोर आहे. इतरांना मात्र प्रियांका चोप्राने साकारलेली चॅम्पियन मेरी कोम 5 सप्टेंबरला पाहायला मिळेल.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close