लातूर जिल्ह्यात तीन दिवसांत तीन बलात्कार

August 22, 2014 11:26 AM1 commentViews: 2323

rape-victims-

22 ऑगस्ट :  मराठवाड्यात महिला आणि विशेषत: लहान मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना वाढतच चाल्या आहेत. लातूर जिल्ह्यात सलग तीन दिवस बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आहे. यातल्या दोन घटनांमध्ये मुली अल्पवयीन आहेत. यात औसामधली बलात्काराची घटना अत्यंत धक्कादायक आहे. औसा शहरात कपडे धुण्यासाठी पाणीसाठ्यावर गेलेल्या चौदा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी नितीन सूर्यवंशी या एका आरोपीला अटक केलीय तर इतर दोघे जण अजूनही फरार आहेत.

लातूर जिल्ह्यातल्या भूतमुगळी गावात एका चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला आहे. उदगीरमध्येही एका भाजीपाला विकणार्‍या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. शहरापासून ते खेड्यापर्यंत अशा घटनांचं प्रमाण वाढलंय, अल्पवयीन मुलींवरच्या या सामूहिक बलात्काराने संपूर्ण लातूर जिल्हाच हादरून गेला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sham Dhumal

    भ्रष्टाचारामुळे कायद्याचा योग्य वापर होत नाही. त्यामुळे गुन्हेगारांना भीती वाटत नाही.

close