पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल यांची मुक्ताफळं!

August 22, 2014 11:42 AM0 commentsViews: 7613

delip sopal
22 ऑगस्ट : पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल यांनी काल सांगलीमध्ये वादग्रस्त विधान केलं.  गृहमंत्री आर आर पाटिल यांची स्तुती करताना सोपलांची चीभ चांगलीच घरसली. ते म्हणाले, आर आर पाटिल एकदा राणी मुखर्जीशी हात मिळवायला लाजत होते. मग मी त्यांना म्हणालो ‘राणी मुखर्जी ‘आऊट डेटेड’ होत चालली आहे’, त्यामुळे आबा तुम्ही करिनाच्या हातात जरी हात दिला, तरी तुम्हाला कोण काही म्हणणार नाही, एवढं तुमचं स्वच्छ चरित्र्य आहे, असे वक्तव्य पाणीपुरवठा मंत्री दिलीप सोपल यांनी केल. तासगावमधल्या बेदाणा मार्केटच्या भूमिपूजन समारंभात सोपल यांनी ही मुक्ताफळं उधळली आहे. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर खुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील आणि कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा उपस्थित होते. एवढे वक्तव्य करून मंत्री सोपल थांबले नाहीत तर, बेभरवशाच्या द्राक्ष शेतीबाबत सोपल म्हणाले, ‘आमचे एक जुने नेते म्हणायचे, द्राक्ष शेती करणे म्हणजे जुनाट टीबी झालेल्या पत्नीसोबत संसार केल्यासारखे असते’.

दरम्यान, मंत्री असूनही सोपल असं विधान करत आहेत. महिलांविषयी असं बोलणार्‍या लोकांना मतदान करूच नका, असं आवाहन सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी केलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close