वरुण गांधींवरचा रासुका हटवण्याचे सुप्रिम कोर्टाचे आदेश

May 14, 2009 11:54 AM0 commentsViews:

14 मे,पिलिभीत मतदारसंघातील भाजपचे तरूण उमेदवार वरुण गांधींवर लावण्यात आलेला रासुका हटवण्याचे आदेश आज सुप्रिम कोर्टाने दिले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी वरुण गांधी यांच्यावर रासुका लावण्यात आला होता. या प्रकरणी उत्तरप्रदेश सरकारने केलेल्या कारवाईविरोधात वरुण गांधी यांनी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेश सरकारच्या ऍडव्हायजरी कमिटीने ही कारवाई अयोग्य असल्याचं सांगितलं होतं. यावर सुप्रिम कोर्टाने आज वरुण गांधींवर लावण्यात आलेला रासुका हटवण्यात यावा असे आदेश दिले आहेत. सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयामुळे वरुण गांधींना दिलासा मिळाला आहे. तर वरुण गांधींवरचा रासुका हटवण्यात यावा या सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशामुळे वरूण यांच्या मावशी अंबिका शुक्ला यांनीही सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागतच केलं असल्याचं समजतंय.