जेटली म्हणतात, ‘निर्भया’ घटना छोटी होती !

August 22, 2014 4:17 PM0 commentsViews: 932

jetliy 22 ऑगस्ट : केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या व्यक्तव्यामुळे वाद निर्माण झालाय. दिल्ली घडलेली निर्भया सामूहिक बलात्काराची घटना ही छोटी घटना होती त्यामुळे पर्यटन क्षेत्राचं अब्जावधी रुपयांचं नुकसान झालं, असं जेटली यांनी वक्तव्य केलं होतं.

राज्यांच्या पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. याविरोधात विरोधकांनी जेटलींवर सडकून टीका केली आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात महिलांवर होणार्‍या अत्याचाराबद्दल चिंता व्यक्त केली होती.

त्यामुळे जेटलींच्या वक्तव्याबद्दल पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी आपच्या प्रवक्ते मनिष सिसोदिया यांनी केली. दिल्ली गँगरेप प्रकरणातील पीडित मुलीच्या पालकांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे.

पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. असंवेदनशील वक्तव्य करणं हा कधीच माझा हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण नंतर जेटलींनी दिलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close