महायुतीत राहायचं की नाही ?, कदमांचा शेट्टींना थेट इशारा

August 22, 2014 5:27 PM0 commentsViews: 7923

ramdas kadam on shetty22 ऑगस्ट : ज्याची जशी ताकद आहे त्यानुसार जागावाटपावर चर्चा करून निर्णय घेऊ पण राजू शेट्टी यांना असं वाटतंच असेल तर महायुती राहायचं की नाही राहायचंय हे त्यांनीच ठरवावं असा स्पष्ट इशारा शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी दिलाय.

तसंच अजून फक्त जागावाटपावर चर्चाच सुरू आहे. पण राजू शेट्टी यांनी अगोदरच 50 ते 60 जागांची मागणी केली आहे. आमच्या कोकणात एक म्हण आहे ‘द्याजामध्ये मुलगी मोडायची’ म्हणजे लग्न करायचं नसेल तर जास्त हुंडा मागून लग्न मोडायचं असं काही जर कुणी करत असेल तर आम्हीही काही करू शकत नाही असा टोलाही कदम यांनी लगावला.

एकीकडे महायुतीत जागावाटपावरुन विलंब आणि त्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या माजी नेत्यांच्या शिवसेना प्रवेशावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सडकून टीका केली होती.

काँग्रेस राष्ट्रवादीचं जहाज आता बुडू लागलंय. पण त्या जहाजाला कुडतरणारे उंदीर आता महायुतीच्या जहाजात बसू पाहत आहेत. त्यांना किती महत्त्व द्यायचं हे शिवसेना-भाजपनं आता ठरवायला हवं. नाहीतर महायुतीचं जहाज बुडायला वेळ लागणार नाही अशी भीती राजू शेट्टी यांनी व्यक्त केली होती. राजू शेट्टी यांची टीका शिवसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागली. रामदास कदम यांनी शिवसेना स्टाईलने शेट्टी यांच्या विधानाचा समाचार घेत महायुतीत राहयचं की नाही असा इशाराच दिला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close