‘चपाती’ राड्यातून सेनेच्या खासदारांची सुटका

August 22, 2014 3:42 PM0 commentsViews: 738

vichare contro22 ऑगस्ट : नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात ‘चपाती’ वादात शिवसेना खासदारांना दिलासा मिळाला आहे. शिवसेना खासदारांविरोधातली याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे. शिवसेनेच्या 11 खासदारांची खासदारकी रद्द करण्यासंदर्भात ही याचिका दाखल करण्यात आली होती.

16 जुलै रोजी शिवसेनेच्या खासदारांनी महाराष्ट्र सदनात निकृष्ट जेवण मिळत असल्यामुळे आंदोलन केलं होतं. सेनेचे खासदार राजन विचारे यांनी एका मुस्लीम सुपरव्हायजर अर्शद झुबेरला बळजबरीने चपाती तोंडात कोंबण्याचा प्रयत्न केला. रमझानचा महिना असल्यामुळे त्याचा रोजा तुटला असा आरोप राजन यांच्यावर करण्यात आला. सेनेच्या या कृत्यामुळे चौफेर टीका झाली होती.

याच प्रकरणी दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र सुपरव्हायजर अर्शद झुबेरने सेनेच्या खासदारांच्या विरोधात कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखली केली नसल्यामुळे कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे आता सेनेच्या खासदारांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close