काँग्रेस फोडणार 1 सप्टेंबरला प्रचाराचा नारळ

August 22, 2014 6:26 PM0 commentsViews: 1434

narayan rane manikrao thakre and prithviraj chavan22 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीची घोषणा आता आठवड्याभरावर येऊन ठेपली आहे. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव बाजूला सारुन काँग्रेसने आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून काँग्रेस विधानसभा प्रचाराला सुरूवात करणार आहे. 1 सप्टेंबर रोजी काँग्रेस मुंबईत हुतात्मा चौकातून मशाल घेऊन राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचाराला सुरुवात करणार असल्याची माहिती प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी दिली.

आज (शुक्रवारी) मुंबईत काँग्रेसच्या प्रचार समितीची टिळक भवनात बैठक झाली. त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत त्याविषयी माहिती दिली. गेल्या 4 वर्षांमध्ये आघाडी सरकारने केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मात्र, काँग्रेसनं केलेल्या विकास कामांची उद्घाटनं पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असल्याची टीका राणे यांनी केली. त्याचबरोबर मोदींच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा होणारा अपमान सहन करणार नाही असा इशारा द्यायलाही राणे विसरले नाहीत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close