राजेंद्र हुंजेंना दादा कोंडके समाजभूषण पुरस्कार प्रदान

August 22, 2014 11:08 PM0 commentsViews: 228

22 ऑगस्ट : दादा कोंडके मेमोरिअल फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा यंदाचा दादा कोंडके समाजभूषण पुरस्कार IBN लोकमतचे न्यूज एडिटर राजेंद्र हुंजे यांना प्रदान कऱण्यात आलाय. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या हस्ते राजेंद्र हुंजे यांना गौरवण्यात आलं. स्मृतीचिन्ह, शाल , श्रीफळ, 5000 रूपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. या पुरस्काराचं यंदाचं हे 9 वं वर्ष आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात पुणे ते पंढरपूर पायी वारी अडीच दिवसात पूर्ण करणार्‍या हिमांशू सांख्ये यालाही विशेष सन्मानानं गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाला शशिकांत पागे, विजय कोलते, मल्हार अरणकल्ले हे मान्यवर हजर होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++