राष्ट्रवादीला धक्का, सूर्यकांता पाटील बंडाच्या पवित्र्यात ?

August 22, 2014 11:18 PM0 commentsViews: 4551

surykanta patil22 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा लवकरच होणार आहे. सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली. तर दुसरीकडे बंडोबांनी दंड थोपडले आहे.

राष्ट्रवादीच्या माजी खासदार सूर्यकांता पाटील बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा, या काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा दिलाय.

राष्ट्रवादीचे अधक्ष्य शरद पवार यांनी काँग्रेसला साथ द्यावी असं मत सूर्यकांता पाटील यांनी वक्तव्य केलंय. तसंच त्या भाजपच्या संपर्कात असल्याचीही माहिती कळतेय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close