बाळासाहेब थोरातांवर शिवसेना कार्यकर्त्याकडून शाईफेक

August 23, 2014 1:31 PM2 commentsViews: 2407

balasaheb thorat Ink thrown news23 ऑगस्ट : संगमनेरमध्ये राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर शाईफेक करण्याची घटना घडलीये. शिवसेनेचा कार्यकर्ता भाऊसाहेब हसे यानेही शाईफेक केलीय. हा व्यक्ती धनगर समितीचा कार्यकर्ता असल्याचंही कळतंय. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

संगमनेरमधील राजापूर इथं बाळासाहेब थोरात विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते त्यावेळी ही घटना घडली. बाळासाहेब थोरात यांच्यावर शाईफेक केल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त करत राजापूर येथील शिवसेना कार्यालयाची तोडफोड केली आहे.

तसंच शाईफेकीच्या निषेधार्थ रास्तारोकोही केला आहे. मात्रही घटना राजकीय वैमनस्यातून घडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा राजकीय स्टंट आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी शांत राहावं, कायदा हातात घेऊ नये असं आवाहन थोरात यांनी केलंय.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. वाकचौरेंच्या प्रवेशामुळे शिवसैनिकांनी त्यांना मारहाण झाली होती. ही मारहाण भाऊसाहेब हसे यानेच केली होती. मात्रही शाईफेक का केली हे मात्र कळू शकलं नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • yogesh gosavi

  मी आता लंडन मध्ये स्थाईक झालो आहे पण मुळचा संगमनेतचा आहे. ना.बाळासाहेब थोरात याच्यावर शाई फेकण्यात आली कळाल्यावर मन अतिशय व्यतिथ झालं.सध्या ते कांग्रेस मध्ये स्वच्छ प्रतिमेचे आणि प्रामाणिक एक मात्र नेते आहेत.मी सामान्य कुटंबातला आहे.माझ्या वडिलांना कॅन्सर झाला होता अश्यावेळी त्यांनी आर्थिक मदत तर केलीच पण वेळोवेळी आपुलकीने चौकशी केली मी कधीही विसरणार नाही.
  अश्या संगमकरांच्या हक्काच्या माणसावर शाई फेकून शिवसेने होते नव्हते तेवढे अस्तित्व स्वहाने संपवले..
  मनापासून माणुसकीच्या शत्रुंचा निषेध……..

 • yogesh gosavi

  मी आता लंडन मध्ये स्थाईक झालो आहे पण मुळचा संगमनेरचा आहे. ना.बाळासाहेब थोरात याच्यावर शाईफेकण्यात आली कळाल्यावर मन अतिशय व्यतिथ झालं.सध्या ते कांग्रेस मध्ये स्वच्छ प्रतिमेचे आणि एक मात्र प्रामाणिक नेते आहेत.मी सामान्य कुटंबातला आहे.माझ्या वडिलांना कॅन्सर झाला होता अश्यावेळी त्यांनी आर्थिक मदत तर केलीच पण वेळोवेळी आपुलकीने चौकशी केली मी कधीही विसरणार नाही.अश्या संगमकरांच्या हक्काच्या माणसावर शाई फेकून शिवसेने
  होते नव्हते तेवढे अस्तित्व स्वहाने संपवले..

  मनापासून माणुसकीच्या शत्रुंचा निषेध……..

close