पुण्याच्या फॅशन इन्स्टिट्यूटवर हल्ला

May 14, 2009 4:23 PM0 commentsViews: 3

14 मे पतित पावन संघटनेने पुण्याच्या फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये तोडफोड केली आहे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण प्रसारक संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलाजी विभागामध्ये त्यांनी ही तोडफोड केलीय. या इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी काल वारकर्‍यांच्या वेशातला फॅशन शो सादर केला होता. त्यावर वारकरी संतापले होते. आयबीएन लोकमतनं पहिल्यांदी ही बातमी दाखवली. त्यानंतर या इन्स्टिट्यूटने दिलगिरीही व्यक्त केली होती. पण आज पुन्हा पतित पावन संघटनेनं इथे तोडफोड केली होती. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण प्रसारक संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलाजी विभागाने वारकर्‍यांच्या वेशातला फॅशन शो नुकताच सादर केला होता. त्यामधे वारकर्‍यांच्या वेशातल्या मॉडेल्सनं वारकर्‍यांच्या पेहरावाला आधुनिक टच देण्याच्या नावाखाली या मॉडेल्सनं चक्क चिपळ्या, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात वीणा घेऊन रॅम्पवर कॅट वॉक केला. मात्र हा आगळावेगळा फॅशन शो पाहून वारकर्‍यांच्या भावना दुखावणारी घटना घडली होती. त्यामुळे अशाप्रकारे वारकर्‍यांचा पोषाख घालून या मॉडेल्सनी रॅम्पवॉक करण्याची गरज होती का असा प्रश्न आता उपस्थित झालाय.

close