लोकल प्लॅटफॉर्मवर सोनसाखळी चोरी सीसीटीव्हीत कैद

August 23, 2014 7:43 PM0 commentsViews: 7594

23 ऑगस्ट : चोर चोरी करण्यासाठी कशी शक्कल लढवू शकतो याचा नेम नाही. पण मुंबईमध्ये लोकल स्टेशनवर भरगर्दीत सोन साखळीचोराचा पराक्रम सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालाय आणि याच सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबईतील नेहमी गर्दीने गजबजलेलं कुर्ला स्टेशनच्या प्लॅटफार्मवर एक महिला लोकलची वाट पाहत होती. तितक्यात हा सोनसाखळी चोर समोरुन येतो आणि महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचतो आणि रेल्वे ट्रॅकवर उडी टाकून पसारा होतो. ही महिला आरडाओरडाही करते पण ट्रॅकरवरुन तोपर्यंत चोर गायब झालेला असतो. हे सगळं दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालंय. कुर्ला स्टेशनच्या हार्बरलाईनच्या 7 आणि8 प्लॅटफॉर्मवर ही घटना घडली होती. 12 ऑगस्टच्या या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे सोनसाखळी चोराला पकडण्यात पोलिसांना यश आलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close