यूपीएससीची परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार

August 23, 2014 9:21 PM0 commentsViews: 354

upsc_exam_issiue23 ऑगस्ट : केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीची पूर्वपरीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानूसार उद्याच होणार आहे. यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेला स्थगिती देणारी उमेदवारांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.

9 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. त्यामुळे ही पूर्वपरीक्षा पुढे ढकलता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने बजावलं. या परीक्षेची रचना हिंदी भाषिक विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे, या कारणावरून महिनाभरापासून काही विद्यार्थी आंदोलन करत होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close