महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायण यांची बदली

August 24, 2014 2:20 PM0 commentsViews: 2078

K. shankarnarayan
24 ऑगस्ट : महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायण यांची मिझोरमच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली आहे. शनिवारी मध्यरात्री त्यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले.

गुजरातचे राज्यपाल ओ. पी. कोहली यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. के. शंकरनारायण यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा कालावधी 2017 साली संपणार होता. परंतू मिझोरामच्या राज्यपाल कमला बेनिवाल यांना निलंबित केल्यापासून ही जागा रिकामी होती. पंतप्रधान मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी आणि कमला बेनिवाल यांच्यामध्ये विरोध निर्माण झाला होता. कमला बेनिवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवून केंद्र सरकारने निलंबित केले होते. त्याआधी मिझोरमचे राज्यपाल वक्कोम पुरुषोथमन यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान ही बदली अत्यंत दुदैर्वी आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसन दिली आहे. राज्यपालांची मध्यरात्री तडकाफडकी बदली करणं चुकीचं आहे आणि यातून नोकरशाही आपल्याच बाजूची हवी असा सरकारचा हट्ट दिसतोय, असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

close