व्ही. शांताराम आणि राज कपूर स्मृती पुरस्कार जाहीर

May 14, 2009 4:38 PM0 commentsViews: 7

14 मे, राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे व्ही. शांताराम आणि राज कपूर स्मृती पुरस्कार जाहीर झाले आहेत. गीतकार जगदीश खेबुडकर यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालाय तर विशेष योगदान पुरस्कार महेश कोठारे यांना देण्यात येणार आहे. राजकपूर स्मृती जीवनगौरव पुरस्कार अभिनेत्री रेखाला जाहीर झालाय तर विशेष योगदान पुरस्कारासाठी आमिर खानची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांचं वितरण 30 मेला पुण्यात करण्यात येणार आहे अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

close