महिंद्र अँड महिंद्रच्या कर्मचार्‍यांचा संप मागे घेण्यास नकार

May 14, 2009 4:43 PM0 commentsViews: 1

14 मे, नाशिकमहिंद्र अँड महिंद्रच्या नाशिक प्लान्टमधील कर्मचार्‍यांनी संप मागे घेण्यासाठी नकार दिला आहे. लेबर कोर्टानं दिलेल्या निर्णयाविरुद्ध हे संपकरी आता मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहेत. हा संप बेकायदेशीर असून कामगारांनी येत्या 48 तासात कामावर रुजू झालं पाहीजे असे आदेश लेबर कोर्टाने काल दिले आहेत. महिंद्र अँड महिंद्रच्या कर्मचारी युनियनंचे सदस्य आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. या संपामुळे कारखान्याला कच्चा माल पुरवणारे व्हेंडर्सही नुकसान सहन करत आहेत. कंपनीसाठी नाशिकमध्ये सुमारे एक हजार व्हेंडर्स कच्चा माल पुरवतात पण संपामुळे त्यांचा माल पडून आहे. गेल्या आठवड्यापासून सात हजार कामगारांनी संपूर्ण टूल बंद आंदोलन सुरु केलंय.

close