बाळासाहेब थोरात यांना जीवेमारण्याचा होता प्रयत्न?

August 24, 2014 8:37 PM0 commentsViews: 4916

babashaeb thorat

24 ऑगस्ट : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर शाईफेक प्रकरणी नवीन खुलासा झाला आहे. हल्लेखोराचा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर शाई फेकण्यासोबतचं प्राणघातक हल्ला करण्याचाही इरादा असल्याचं समोर आलं आहे.

संगमनेरमधला युवा सेनेचा उपाध्यक्ष भाऊसाहेब हासे यानं काल बाळासाहेब थोरात यांच्या अंगावर शाई फेकली होती. त्याचवेळी हल्लेखारानं गुप्ती लपवून आणली होती, ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना हा प्रकार लक्षात आला. सुरक्षा रक्षकांनी त्याला तातडीनं पकडल्यामुळे महसूलमंत्र्यांचा जीव वाचला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अंगावर शाई फेकली असताना, ती त्यांच्या डोळ्यात जाऊन डाव्या डोळ्याला इजा झाली होती. त्यावर त्यांना उपचारही घ्यावे लागले होते. आता हा प्रकार उघड झाल्यामुळे राज्यात मंत्रीच सुरक्षित नाहीत असं चित्र दिसतं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close