सूर्यकांता पाटील यांचा राष्ट्रवादीला रामराम

August 25, 2014 9:18 AM0 commentsViews: 1421

Suryakanta patil
25 ऑगस्ट :  विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी पक्षाला लागलेली गळती थांबण्याचे काही चिन्ह दिसत नाहीत. शरद पवारांपासून जितेंद्र आव्हाडांपर्यंतच्या पक्षनेत्यांवर टीका केल्यानंतर माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रवादीसोबतचा आपला 15 वर्षांचा प्रवास थांबवला आहे. आपला राजीनामा त्यांनी पक्ष कार्यालयात पाठवला आहे.

परिवारात काही मुले खोडकर असतात, अशी अजित पवारांचे नाव न घेता टीका करत काल त्यांनी शरद पवारांवरही थेट हल्ला केला आहे. विनातक्रार काम करूनही लोकसभा निवडणुकीसाठी आपलं तिकीट कापलं अशी खंत त्यांनी यावळेस व्यक्त केली. सूर्यकांता पाटील या काही वर्षांपूर्वी पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय समजल्या जायच्या. माझ्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले .पुढील राजकीय निर्णयाची माहिती जाणून घेण्यासाठी तीन-चार दिवस थांबण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close