26/11 च्या खटल्यात नोंदवल्या महत्त्वाच्या साक्षी

May 14, 2009 5:26 PM0 commentsViews: 5

14 मे, मुंबई मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंबंधीच्या सुनावणीत आज आर्थर रोडच्या विशेष कोर्टात महत्त्वाच्या साक्षी नोंदवल्या. वायरलेस ऑपरेटर पोलीस सुधीर देसाई, डी.बी.मार्ग पोलिस ठाण्याचे पोलीस सब इन्सपेक्टर राजेंद्र बोडके तसंच गिरगाव चौपाटी वर झालेल्या एन्काउन्टरप्रकरणी शशिकांत कदम यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. तर गिरगाव चौपाटी इथून दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तू साक्षीदारांनी ओळखल्या.

close