दुष्काळामुळे बळीराजाच्या बैलपोळ्यावर संक्रांत

August 25, 2014 1:31 PM0 commentsViews: 216

नितीन बनसोडे, लातूर
25 ऑगस्ट :  आज बैलपोळा… शेतकरी वर्षभर आतुरतेनं वाट पाहत असतात ती बैलपोळ्याची. बळीराजासाठी हा सण दिवाळीपेक्षाही मोठा. मात्र पावसानं फिरवलेली पाठ आणि वाढती महागाई यामुळे यंदा या सणावरच संक्रांत आलीये. यंदा कमी पावसामुळे मराठवाड्यातला शेतकरी संकटात सापडला आहे. आता बैलपोळ्याचा सण तरी साजरा करावा का, असा प्रश्न त्यांना पडलाय. बैलपोळा म्हणजे बैलांना सजवण्याचा दिवस. मात्र, त्यासाठीचं साहित्य विकणार्‍या व्यापार्‍यांनाही अल्प पावसाचा फटका बसला आहे.

पावसाने तोंड फिरवल्याने पिकांसोबतच जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. काही शेतकर्‍यांवर बैल विकायची वेळ आली आहे.

इतका महत्त्वाचा सण आला तरी बळीराजा उदास आहे. परंपरा म्हणून बैलपोळा साजरा होईलही पण त्यात नेहमीचा जोश मात्र नसेल यांची सर्वांनाच खंत राहील.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close