गडचिरोलीत भातशेतीचा आधुनिक प्रयोग

August 25, 2014 12:42 PM0 commentsViews: 2304

gadchiroli perni
25 ऑगस्ट : गडचिरोलीत भातशेतीचा नवा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. भातशेतीसाठी येणारा खर्च कमी करण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी यांत्रिकीकरणातून भातशेती आता करता येणार आहे. यात महिला आणि पुरुषांचे 37 गट तयार करून पाचशे एकर क्षेत्रात ही भातशेती केली जाणार आहे. बचतगटांद्वारे सामूहिक आणि यांत्रिकीकरणातून शेतीचा हा राज्यातला पहिलाच प्रयोग आहे. गडचिरोलीसह राज्यात भात शेती करणारे 11 जिल्हे आहेत. भात शेतीसाठी मजुरांची टंचाई आणि येणारा खर्च कमी करून वेळेची बचत करण्यासाठी यांत्रिकीकरणातून भात शेती करण्याचा नवा प्रयोग गडचिरोलीत करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या पुढाकाराने ही आधुनिक भातशेती करण्यात येणारे आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close