बिहारमध्ये 10 पैकी 6 जागांवर नितीश-लालूंची आघाडी

August 25, 2014 2:06 PM0 commentsViews: 1760

lalu_nitesh25 ऑगस्ट : चार राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. बिहारमध्ये 10 पैकी 6 जागांवर आरजेडी, जेडीयू आणि काँग्रेसचं महागठबंधन आघाडीवर आहे. तर भाजप चार जागांवर आघाडीवर आहे. बिहारमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. या पोटनिवडणुकाही त्याचीच रंगीत तालीम समजली जातेय. तर मध्य प्रदेशात दोन जागांवर भाजप आघाडीवर आहे. विजयराघवगड आणि बाहोरीबंड या जागांवर भाजप आघाडीवर आहे.

पंजाबमधल्या पटियाला विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रेणीत कौर 23 हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. तर कर्नाटकमध्येही पोटनिवडणूक झाली. तिथे काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवलाय. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येड्डीयुरप्पांचा मुलगा बीवाय राघवेंद्र यांनी शिकारीपूर मतदारसंघ काबीज केलाय. तर काँग्रेसचे NY गोपाळकृष्ण यांनी बेल्लारी ग्रामीण मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

  • या प्रकारची युती यश मिळवू शकते, असा इतर प्रादेशिक पक्षांना संदेश
  • जेडीयू आणि आरजेडी कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह येईल
  • या दोन पक्षातल्या नेत्यांचं पक्षांतराचं प्रमाण कमी होण्याची शक्यता
  • जीतन राम मांझी यांच्या सरकारला अधिक स्थैर्य लाभण्याची शक्यता
  • जातीचा मुद्दा पुन्हा सक्रिय होणार

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close