स्वाभिमानी-रिपाइंला प्रत्येकी 6 जागा मिळण्याची शक्यता

August 25, 2014 4:27 PM0 commentsViews: 3568

raju shetty and ramdas athavale25 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीची घोषणा आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची लगबग सुरू झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून रखडलेला महायुतीतला जागावाटपाचा तिढा सुटण्याची चिन्हं आहेत. महायुतीतील घटक पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आरपीआयला प्रत्येकी सहा जागा मिळण्याची शक्यता आहे तर राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्रामला प्रत्येकी दोन जागा मिळण्याची शक्यता आहे.

या जागावाटपावर मित्रपक्ष समाधानी असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे येत्या 1 सप्टेंबरला महायुतीतील मित्रपक्षांच्या जागावाटपाची घोषणा होईल, अशी माहिती मिळतेय. त्यानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यातलं जागावाटप निश्चित होईल.

दरम्यान, महायुतीतलं जागावाटपाचं अंतिम सूत्र सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ठरेल आणि मित्रपक्षही नाराज नाही, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये. तसंच आपण मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नसल्याचंही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. मागील शनिवारी तर भाजपचे नेते विनोद तावडे यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत 1 सप्टेंबरला जागावाटप जाहीर केलं जाईल असं स्पष्ट केलं होतं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close