इंग्लंड-भारत पहिली वनडे पावसामुळे रद्द

August 25, 2014 7:06 PM0 commentsViews: 517

england india one day25 ऑगस्ट : इंग्लंड दौर्‍यावर असलेल्या भारतीय टीमने कसोटी सामन्यात सपाटून पराभवाला सामोरं गेल्यानंतर आजपासून एकदिवशीय सामन्यासाठी मैदानात उतरली आहे.

पण पहिल्याच मॅचमध्ये पावसानं व्यत्यय आणला आहे. जोरदारपावसामुळे पहिली मॅच सुरू होण्याअगोदरच रद्द करण्यात आली आहे. पावसामुळे आजच्या वनडेचा टॉसही करता आला नाही.

इंग्लंड आणि भारत दरम्यान एकूण पाच सामने खेळवले जाणार आहे. मात्र आज पहिल्या मॅचसाठी आलेल्या प्रेक्षकांची पावसाने निराश केली. कसोटी सामन्यात 1-3 ने पराभवामुळे खच्चलेली टीम इंडिया एकदिवशीय सामन्यात विजयी सलामी देईल अशी अपेक्षा होती मात्र पावसाने टीम इंडियाच्या स्वप्न पाणी पडले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close