ठाकरे-पवार संभाषणाची ‘सामना’तून कबुली

May 15, 2009 1:42 PM0 commentsViews: 5

15 मे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं फोनवरून बोलणं झालं असल्याची अशी कबुली शिवसेनेने दिली आहे. शिवसेनेने त्यांचं मुखपत्र सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या संपादकीयात तसं मान्य केलं आहे. पवार आणि उध्दव ठाकरे एकमेकांशी बोलले तर तुमचं काय जातं, असा उलटा सवाल या संपादकीयात करण्यात आला आहे. पवार आणि ठाकरे कुटुंबांचे संबंध खूप जुने आहेत. मात्र पवार आणि ठाकरे कुटुंब एकमेकांच्या संपर्कात असल्याचं या संपादकीयात मान्य करण्यात आलंय. पवारांच्या राजकीय अडचणीमुळे ते मान्य करणार नाहीत. पण शिवसेनेला कुणाला घाबरण्याचं कारण नाही असंही त्या संपादकीयात नमूद केलं आहे. या अग्रलेखाच्या शेवटी शिवसेना एनडीएसोबत होती आणि आहे याचीही खात्रीही दिली आहे.

close