राज्यात मतमोजणीची जरोत तयारी

May 15, 2009 1:46 PM0 commentsViews: 2

15 मे 16 मेपासून संपूर्ण देशातल्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातल्या 48 मतमोजणीकेंद्रांवर मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून महाराष्ट्रातल्या एकूण 1 लाख 35 हजार इलेक्शन व्होटिंग मशिन्समध्ये बंद मतांच्या मोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी जवळजवळ 10 हजार शासकीय कर्मचारी तैनात करण्यात आलेत. ' सर्वात जास्त मतदान झालेल्या मतदारसंघातील निकाल हाती येण्यास मतमोजणीच्या 23 फेर्‍या लागतील, तर इतर मतदारसंघांचे निकाल 17 ते 18 फेर्‍यांत हाती येतील, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. पंधराव्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातल्या सर्व 48 मतदारसंघांमध्ये सरासरी 50.76 टक्के मतदान झालंय.

close