लायबेरियातून आज 114 भारतीय परतणार, विमानतळांवर हाय अलर्ट

August 26, 2014 9:56 AM0 commentsViews: 1034

ebola virus

26 ऑगस्ट :  इबोला रोगाने ग्रस्त असलेल्या पश्चिम आफ्रिकेतल्या लायबेरियातून 114 भारतीय आज परतणार असल्याने विमानतळांवर हाय अलर्ट जारी केला आहे.

विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज इबोलाग्रस्त लायबेरियातून या 114 जणांची कसून वैद्यकीय तपासणी होणार आहे. तपासणीत या आजाराची लागण झाली नसलेल्या नागरिकांना टर्मिनलवर सोडण्यात येणार आहे. तर, या आजाराची लक्षणे असलेल्यांना थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे.

दरम्यान, नायजेरियातून भारतात आलेल्या एका 32 वर्षाच्या नागरिकाला इबोला नसल्याचे वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट झाले आहे. मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये त्याची तपासणी करण्यात आली. इबोला या रोगाने पश्चिम आफ्रिकेत आतापर्यंत 1200 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या रोगाची आणीबाणी घोषित केली आहे. या रोगावर अद्याप कोणताही ठोस उपचार उपलब्ध नाही.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close