अभिनेता शाहरुख खानला मुंबई पोलीस पुरवणार सुरक्षा

August 26, 2014 8:59 AM0 commentsViews: 2323

Shahrukh khan security

26 ऑगस्ट :  गँगस्टर रवी पुजारीकडून धमकी मिळाल्यानंतर आज अभिनेता शाहरुख खानच्या मुंबईतल्या मन्नत बंगल्याबाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढविली आहे. क्राईम ब्रँचची एक टीम ‘मन्नत’बाहेर तैनात करण्यात आली आहे.

गँगस्टर रवी पुजारीने शाहरुखचे सहकारी करीम मोरानींमार्फत शाहरुखकडे खंडणीची मागणी केली आहे. क्राईम ब्रँचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री शाहरुखचे सहकारी करीम मोरानीच्या घराबाहेर केलेला गोळीबार शाहरुखला घाबरवण्यासाठीच केला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गँगस्टर रवी पुजारीच्या एका साथीदार्‍याला ताब्यात घेतलं आहे, त्याची कसून चौकशी सुरू आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close