लायबेरियातून परतलेले 6 प्रवासी इबोला संशयित

August 26, 2014 1:15 PM0 commentsViews: 1991

Ebola Indians
26  ऑगस्ट :  इबोला रोगाने ग्रस्त असलेल्या पश्चिम आफ्रिकेतल्या लायबेरियातून 114 भारतीय आज परतणार असल्याने विमानतळांवर हाय ऍलर्ट देण्यात आला आहे. दिल्ली विमानतळावर परतलेल्या काही प्रवाश्यांपैकी 6 जणांची इबोलाचे संशयित रुग्ण म्हणून राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने यासाठी विशेष टीम्स विमानतळांवर तैनात केलेल्या आहेत आणि या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी विमानतळांवर स्पेशल सेक्शन तयार करण्यात आलेले आहेत. त्यासोबत या सर्व प्रवाश्यांना वेगळे बूट्स, मास्क आणि चष्मे घालून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

दरम्यान, नायजेरियातून भारतात आलेल्या एका 32 वर्षाच्या नागरिकाला इबोला नसल्याचे वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट झाले आहे. मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये त्याची तपासणी करण्यात आली. इबोला या रोगाने पश्चिम आफ्रिकेत आतापर्यंत 1200 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या रोगाची आणीबाणी घोषित केली आहे. या रोगावर अद्याप कोणताही ठोस उपचार उपलब्ध नाही.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close