धारावीत 102 वर्षांपासून साजरा होतोय गणेशोत्सव

August 26, 2014 1:34 PM0 commentsViews: 411

रोहन कदम, मुंबई
26 ऑगस्ट :  मुंबईत अशी गणेशोत्सव मंडळं आहेत ज्यांचा गणेशोत्सव हा स्वातंत्र्याच्या आधीपासूनच सुरू झाला होता. धारावीमध्ये एक असं गणपती मंदिर आहे जिथे गेली 102 वर्षं गणेशोत्सव साजरा होतोय आणि तोही सव्वाशे वर्षांपूर्वी तामिळनाडूतून मुंबईत आलेल्या आदी द्रविड समाजाच्या गणेशभक्तांकडून…

धारावीतलं हे आदी द्रविड महाजन संघाचं गणेश मंदिर. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू आहे. कारण मंडळाचं हे यंदाचं 102वं वर्ष आहे. हा गणपती मुंबईतला दुसरा सर्वांत जुना गणपती आहे.

तामिळनाडूतलं तिरूनेलवेली हे आदी द्रविड समाजाचं मूळ गाव. मात्र सवर्णांकडून वारंवार होणार्‍या अत्याचारांमुळे या समाजानं स्थलांतर केलं आणि ते धारावीतल्या क्रॉस रोड विभागात स्थायिक झाले. 1911ला जेव्हा मंदिराची स्थापना झाली त्यावेळची पहिली गणेशमूर्तीही अजून या मंदिरात आहे आणि तिची पूजाही केली जाते. मंदिर समितीकडून आता या विभागातल्या गरीब मुलांसाठी शाळाही चालवली जातेय. मराठी वातावरणात होणारा हा द्रविड लोकांचा गणेशोत्सव खरोखरच अनोखा आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close