भाजपच्या संसदीत मंडळातून अडवाणी, जोशींची गच्छंती

August 26, 2014 5:30 PM0 commentsViews: 1089

advani and manohar joshi bjp26 ऑगस्ट : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या संसदीय मंडळाची यादी जाहीर केली आहे. या यादीतून ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आलंय. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांचा संसदीय मंडळात समावेश करण्यात आला नाही.

तर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, जे पी नड्डा यांचा संसदीय मंडळात समावेश करण्यात आलाय. तर ज्येष्ठ नेत्यांचा पक्षाच्या मार्गदर्शक मंडळात समावेश करण्यात आलाय. या मार्गदर्शक मंडळात नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे.

संसदीय मंडळात अमित शाह, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अरूण जेटली, सुषमा स्वराज, व्यंकया नायडू, नितीन गडकरी, अनंतकुमार, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जगत प्रकाश नड्डा यांचा समावेश आहे.

तर केंद्रीय निवडणूक समितीत अमित शाह, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अरूण जेटली, सुषमा स्वराज, व्यंकया नायडू, नितीन गडकरी, अनंतकुमार, थावरचंद गेहलोत, शिवराजसिंह चौहान, जगत प्रकाश नड्डा, रामलाल, जुएल ओराम, शाहनवाज हुसैन आणि विजया रहाटकर यांचा सहभाग आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close