आईस बकेटला देसी उत्तर, होऊन जाऊ द्या राईस बकेट चॅलेंज !

August 26, 2014 7:12 PM0 commentsViews: 2431

raise bucket challenge26 ऑगस्ट : हल्ली एक भलतंच चॅलेंज सुरू आहे. एक बर्फाच्या पाण्याने किंवा बर्फाच्या तुकडे भरलेली बकेट घ्यायची आणि अंगावर ओतून घ्यायची आणि आपल्या तीन जवळच्या खास माणसांना चॅलेंज करायचं. सध्या हा प्रकार सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय अमेरिकेत पसरलेलं हे फॅड भारतातही धडकलंय. पण याला देसी स्टाईलने उत्तर देण्यात आलंय हैदराबादच्या पत्रकार मंजुलता कलानिधी यांनी आता राईस बकेट चॅलेंज सुरू केलंय. या चॅलेंजद्वारे गरजूंना एक बादलीभर तांदूळ देण्याचं आवाहन करण्यात येतंय. आईस बकेट चॅलेंजसारखंच या राईस बकेट चॅलेंजलाही आता वाढला प्रतिसाद मिळतोय.

आईस बकेट चॅलेंजला देण्यात आलेला हा – देसी तडका…राईस बकेट चॅलेंज…सध्या फेसबुकवर हे चॅलेंज चांगलंच गाजतंय. आईस बकेट चॅलेंजमध्ये तुम्हाला डोक्यावर बादलीभर थंडगार पाणी ओतून घ्यावं लागतं. या चँलेंजमध्ये तुम्हाला एखाद्या गरजूला बादलीभर तांदूळ दान करावे लागतात. आपल्या देशात कित्ती जणांना एकवेळचं जेवण मिळत नाही.समाजकार्य घरापासूनच सुरू होतं. त्यासाठी लांब जाण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

हैदराबादच्या पत्रकार मंजुलता कलानिधी यांना सुचलेली ही कल्पना..त्यांच्या परिसरातल्या एका मजुराला बादलीभर तांदूळ देत त्यांनी या राईस बकेट चॅलेंजला सुरूवात केली. त्याचा फोटो फेसबुकवर टाकला आणि हे चॅलेंज पूर्ण करायचं आव्हान मित्रांना दिलं.

मंजुलता म्हणतात, लोकं भारतात हे आईस बकेट चॅलेंज करायला लागले आहेत. पण आपण कशासाठी हे करतोय हे मात्र त्यांना माहित नव्हतं. पण भारतापासून याचं उद्दिष्टं दूर असल्याने मला ते थोडं विचित्र वाटत होतं. म्हणूनच आपल्या घराजवळचं ज्याचा फायदा होईल असं काही करावंसं वाटलं.

यात फक्त तांदूळच दान करण्याची गरज नाही. तुम्ही भाज्या किंवा इतर खाण्याच्या गोष्टी किंवा जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन अगदी 100 रुपयांची औषधंही दान करू शकता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close