राष्ट्रवादीचा पाठिंबा युपीएलाच – प्रफुल्ल पटेल

May 15, 2009 4:35 PM0 commentsViews: 15

15 मे राष्ट्रवादीचा पाठिंबा युपीएलाच असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आयबीएन-लोकमतला दिलं आहे. ते दिल्लीत बोलत होते. शरद पवार पंतप्रधान व्हावे, अशी पक्षाची इच्छा आहे. पण राष्ट्रवादी हा युपीएचाच घटक आहे आणि राष्ट्रवादी युपीएचाच घटक असल्यामुळे पंतप्रधान काँग्रेसचाच असेल, असं सांगितलं आहे. 16 मेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. तेव्हाच काय ते चित्र स्पष्ट होईल, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले. ' युपीएचं नेतृत्व काँग्रेस करत आहे. काँग्रेसचं संख्याबळ कधीही आमच्यापेक्षा जास्तच राहणार आहे. त्यामुळे पंतप्रधान कोण बनेल, कोणत्या पक्षाचा बनेल हे सांगणं आता तरी कठीण आहे. त्यामुळे पंतप्रधान कोण बनणार हे सध्या महत्त्वाचं नाहीये, ' असंही ते म्हणाले. ' मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून आणि महाराष्ट्राचा नागरिक म्हणून शरद पवार पंतप्रधान व्हावे ही माझी इच्छा आहे. पण शेवटी पंतप्रधान कोण बनेल ते 16 मेचा निकाल ठरवणार आहे, असंही ते म्हणाले.

close