कोकण रेल्वेची वाहतूक हळुहळू पूर्वपदावर

August 27, 2014 12:35 PM0 commentsViews: 1630

KR

27 ऑगस्ट : दोन दिवसांपासून विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची गाडी आता हळूहळू रुळावर येतेय. रायगड-महाडनजीकच्या करंजाडी हद्दीत मालगाडीच्या वॅगन्स घसरल्यानंतर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आणि या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. मंगळवारी मालगाडीच्या वॅगन्स हटवण्यात आल्या. त्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येतेय. आज संध्याकाळपर्यंत सर्व गाड्या वेळेवर धावण्याची शक्यता कोकण रेल्वेनं वर्तवलीय. सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यात आली असली तरी वेळापत्रक अजून कोलमडलेलंच आहे. सध्या गाड्या तीन ते चार तास उशिरानं धावत आहेत. पण, कुठलीही गाडी आता रद्द नाही, सर्व गाड्या धावत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close