भ्रष्टाचार घेऊन जा गे मारबत !

August 26, 2014 9:36 PM0 commentsViews: 509

26 ऑगस्ट : नागपूरमध्ये तान्या पोळ्याच्या दिवशी मारबत काढण्याची परंपरा आहे. गेल्या 125 वर्षापासून ही पंरपरा आजही कायम आहे. या मारबतीत काळी आणि पिवळी महत्वाची मारबत मानली जाते. मारबतची पुजा करुन शहरातून मिरवणूक काढली जाते. या मारबत सोबत बडगे असतात. समाजातील ज्वलंत विषयावर जनजागृती करण्यासाठी ह्या परंपरेची सुरुवात झाली होती. या वर्षी महागाई, भ्रष्टाचार, काळा पैसा आणि अंधश्रद्धा या विषयावर 17 मारबत काढण्यात आल्या. शहराच्या इतवारी या मध्यवर्ती भागातून निघालेल्या या मारबत पाहण्यासाठी लाखो लोक जमले होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close