स्टेम सेल थेरपीमुळे कॅप्टन मनीष सिंहना मिळालं जीवनदान

August 27, 2014 9:25 AM0 commentsViews: 475

NAVI MUM STEM CELLS

शैलेश तवटे, नवी मुंबई

27 ऑगस्ट : नवी मुंबईत स्टेम सेल थेरपीमुळे लष्करातल्या एका कॅप्टनला जीवदान मिळालंय. कॅप्टन मनीष सिंह यांना 2010साली दहशतवाद्याबरोबर चकमक सुरू असताना पोटात गोळी लागली..ती गोळी आरपार जाऊन त्यांच्या पाठीच्या कण्याला इजा झाली. यामुळे त्यांच्या शरीराचा अर्धा भाग निकामी झाला होता. न्युरोजन ब्रेन अँड स्पाईन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर स्टेम सेल थेरपीमार्फत उपचार करण्यात आले. आता शरीराच्या त्या अर्ध्या भागाची हालचाल पुन्हा सुरू झालीय..याचा आनंद मनीषला व्यक्तच करता येत नाहीय.

आमच्च्या जवानाला स्टेम सेल थेरपीमुळे जीवदान मिळाले. काश्मीर येथे युद्धादरम्यान गोळी लागल्याने त्यांचे दोनही पाय निकामी झाले होते. अनेक उपाय केल्यानंतर देखील काहीच फरक पडला नव्हता . परंतु स्टेम सेल थेरपीमुळे ते शक्य झाले.

कॅप्टन मनीष सिंग यांची 2010 साली पोस्टिंग झाली होती. यावेळी त्यांचा सामना पाकिस्तानी घुसखोरांशी झाला. चकमक सुरु झाली दोन्ही बाजूला गोळीबार सुरू असताना सिंग यांच्या पोटात एक गोळी घुसून आरपार गेली. यात ते गंभीर जखमी झाले त्यांना प्रथम श्रीनगर आणि नंतर दिल्लीतल्या रुग्णालयात उपचार झाले पण त्यांच्या शरीराचा अर्धा भाग निकामी झाला होता, त्यामुळे ते चालू शकत नव्हते. याचवेळी त्यांना न्युरोजन ब्रेन ऍन्ड स्पाईन या रुग्णालयाची माहिती मिळाली. येथे त्यांच्यावर स्टेम सेल थेरपीचा उपचार गेल्या दीड वर्षापासून सुरू होता. याचबरोबर विविध व्यायाम देखील त्यांनी केले, यामुळे त्यांच्या पायाच्या अर्ध्या भागात आता हालचाल सुरू झालीय, पुन्हा चालू शकल्याने सिंग यांनी आनंद व्यक्त केलाय.

या थेरपीमुळे कॅप्टन यांना चालण्यास मदत करणारे डॉक्टर आलोक शर्मा यांनी या थेरपीची माहिती दिली. ही थेरपी सध्या भारतात प्रगत असून, इतर देशातील 33 रुग्ण त्यांच्या रुग्णालयात हे उपचार घेत आहेत. पूर्वी उपचार होत नसलेल्या आजारांवर ही थेरपी औषध म्हणून वरदान ठरत आहे. मनीष सिंग यांना जीवनदान मिळाल्यानं देशासाठी लढण्यास ते पुन्हा तयार झाले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close