कसाबला ओळखलं नायरच्या दोन डॉक्टरांनी

May 15, 2009 4:37 PM0 commentsViews: 1

15 मे 26/11 दहशतवादी खटल्यातला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याला आणखी दोन साक्षीदारांनी ओळखलं आहे. नायर हॉस्पिटलचे डॉ. वेंकट राममूर्ती आणि डॉ. योगिता देवल हे ते दोन साक्षीदार आहेत. हल्ल्याच्या रात्री जखमी कसाबवर या दोन डॉक्टरांनी उपचार केले होते. आर्थररोड कारागृहात डॉ. राममूर्ती आणि डॉ. देवल यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. 26/11 च्या खटल्याच्या सुनावणीत आतापर्यंत 5 जणांच्या साक्ष झालेल्या आहेत. आजच्या दोन डॉक्टरांच्या साक्ष धरून 26/11 च्या खटल्यातल्या सुनावणीत आतापर्यंत सात साक्ष नोंदवण्यात आल्या आहेत.

close